|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| |
|
|
|
Anu - sphot !!!
मी शोधतोय मलाच माझा मीच आयुष्यातला कल्लोळ वाढतोय आणि एकाकीपण सुद्धा
जीवनाच ध्येय हरवल आहे अर्थाची दिशा कुठे भरकटली आशेचे दिवे मालवुन मी एकटाच बसलोय क्षणांचा हिशोब करीत
कृष्ण सांगून गेला "कर्म" करीत राहा म्हणून आम्ही 'जगत' राहयलो आमचा पेला सारखा 'अर्धा' भरलेला म्हणून पुन्हा पुन्हा भरत राहयलो पण
आयुष्यातला पण कधीच सरत नाही नेहमीच्या परिघाबाहेर आम्ही कधी पडत नाही असेच चालू राहीले तर.... एक दिवस असा येईल
मनातल्या मनात दाबून टाकलेले विचार कोंडून ठेवलेल्या आकांक्षा उर फाडून बाहेर पडतील
आणि तेव्हाच होईल पुण्य-कर्माचा ................. एक महा-भयंकर '' अणुस्फोट " !!!!
|
|
| | |
|
|
|
|
|
|
|